Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रेमविवाहला विरोध झाल्याने युगुलाची आत्महत्या

प्रेमविवाहला विरोध झाल्याने युगुलाची आत्महत्या



सोलापूर : खरा पंचनामा

प्रेमविवाह करण्यास घरच्या मंडळींनी विरोध केल्यामुळे प्रेमीयुगुलाने एका झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोलापूरनजीक कवडे गावात हा प्रकार घडला.

सूरज कुंडलिक चव्हाण (वय २५, रा. खुनेश्वर, ता. मोहोळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्यासोबत मृत्यूला कवटाळलेली मुलगी अल्पवयीन असून ती सोलापुरात अकरावीत शिकत होती.

मृत मुलगी वर्षापूर्वी उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी - खुनेश्वर येथे गेले होती. तेथेच तिचे सूरजबरोबर प्रेम जुळून आले. सूरजच्या घरची आर्थिक स्थिती बेताची असून तो चिंचीळी एमआयडीसीतील एका कारखान्यात नोकरीवर होता. पत्र्याचे शेड असलेल्या घरात तो कुटुबीयांसह राहात होता. इकडे आपल्या मुलीचे प्रेमप्रकरण कानावर येताच आई- वडिलांसह जवळच्या नातेवाईकांनी प्रेमप्रकरणाला विरोध केला. परंतु, ती ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. अगोदर पदवी शिक्षण पूर्ण कर आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न करून देऊ, अशा शब्दांत समजूत घातली तरीही प्रेमप्रकरण सोडून देण्याची मुलीची मानसिकता नव्हती. उलट, आपल्या प्रेमाला आणि लग्नाला घरच्या मंडळींचा विरोधच राहील या विचाराने दोघेही प्रेमीयुगुल वैफल्यग्रस्त झाले आणि त्यांनी एकत्रितपणे आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. सलगर वस्ती पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.