Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अपक्ष लढलो, अपक्षच राहणार : सत्यजित तांबे

अपक्ष लढलो, अपक्षच राहणार : सत्यजित तांबे



नाशिक : खरा पंचनामा 

पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी आज पत्रकार परिषदेतून भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून तांबे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि अपक्ष म्हणूनच भविष्यात काम करणार आहे, असं सत्यजीत तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचा एबी फॉर्म न जोडता अपक्ष फॉर्म भरल्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर काँग्रेससोबतची साथ सोडून ते भाजपासोबत जातात की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. काँग्रेसचे नाव न वापरताही सत्यजित तांबे मोठ्या मताधिक्याने अपक्ष म्हणूनच विजयी झाले. त्यांनी आज त्यांची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.

सत्यजित तांबे लढतील की सुधीर तांबे हे ठरलेलं नव्हतं. त्यानंतर मला 9 जानेवारीला एबी फॉर्म द्यावा असं पदेशाध्यक्षांनी सांगितलं. तर 11 तारखेला फॉर्म मिळाले. एबी फॉर्म चुकीचे देण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यजित तांबे यांनी केला आहे. हे फॉर्म चुकीचे आल्याचेही त्यांनी पक्षाला कळवले होते. ते म्हणाले जर मला अपक्ष फॉर्म भरायचा असता तर मी प्रदेश कार्यालयाला कार्यालयाला चुकीचा फॉर्म आल्याचं कळवलं नसतं असं तांबे म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.