हवालदार कोळीला न्यायालयीन कोठडी
सांगली : खरा पंचनामा
बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिस हवालदार स्वप्नील कोळी (वय ३९, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कोळी याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीसह सात लाखांची खंडणी उकळल्याचाही गुन्हा विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद आहे.
पोलिसांनी सतरा वर्षीय पीडितेची फिर्याद घेतली आहे. मूळची बांगलादेशी असलेल्या मुलीला जानेवारी २०२२ पासून सांगलीत स्वरूप चित्रमंदिराजवळील वस्तीत एका महिलेने व्यवसायासाठी आणले होते. हवालदार कोळी याने पीडितेवर वर्षभरात दोनवेळा अत्याचार केले. या दरम्यान संशयिताने पीडितेकडून सुरुवातीला दोन लाख, तर पोलिसांचा छापा पडण्याआधी माहिती दिल्याबद्दल संबंधित मुलीस आश्रय देणाऱ्या महिलेकडून पाच लाख वसूल केले.
त्यानंतर पुणे येथील रेस्क्यू फाउंडेशनच्या संरक्षण बालगृहात संबंधित मुलीला हलवले आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अटकेनंतर गेल्या चार दिवसांपासून कोळी पोलिस कोठडीत होता. आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिस उपाधीक्षक अजित टिके अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.