शिवसेना कोणाची? उद्यापासून नियमित सुनावणी
नवी दिल्ली : खरा पंचनामा
शिवसेना कुणाची? या प्रश्नाभोवती
गेल्या 6 महिन्यापासून निर्णय प्रलंबित आहे. पण आता उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. शिंदे गट आणि शिवसेनेची याचिका ही लिस्ट झाली असून सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राचा सत्तासंघर्षावर अखेर सुप्रीम कोर्टात 14 फेब्रुवारीपासून घटनापिठापुढे सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापिठापुढे ही सुनावणी होणार आहे. घटनापिठात न्या. शहा, न्या. मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. नार्सिंमा यांचा समावेश आहे.
उद्या न्यायालयाच्या सुचीमध्ये सकाळी १०.३० वाजता ५०१ क्रमांक देण्यात आलेला आहे. सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडले. 40 आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि भाजपच्या मदतीने सरकार देखील स्थापन केले. मात्र हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
मागील सुनावणीत दोन्ही पक्षांकडून कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार, हे मुद्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश घटनापीठाने दिले होते. सत्तासंघर्षप्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागील सुनावणीत केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.