Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चिन्ह मिळताच शिंदे गटाकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली

चिन्ह मिळताच शिंदे गटाकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली



मुंबई : खरा पंचनामा

शुक्रवारी धनुष्यबाण आणि शिवसेनेबाबत निवडणूक आयोगानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं आहे. चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळताच आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 

मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून रखडला असून, शिंदे गट आणि भाजपमधील अनेक इच्छूक मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उद्या त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस असून, ते कोल्हापूरला जाणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या अमित शाह यांच्यासोबत चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. चर्चेनंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यानं विरोधकांकडून देखील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. 

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झालेला नाही. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर कोर्टात सुनावणी सुरू असल्यानं मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं बोललं जातं होतं. मात्र आता निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना शिंदे गटाला दिल्यानं मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.