दागिने पॉलिशच्या बहाण्याने फसवणारी परप्रांतीयांची टोळी अटकेत
कोल्हापूर : खरा पंचनामा
सोन्याचे दागिने पॉलिश बहाण्याने महिलांची फसवणूक करणारी सहा परप्रांतीयांच्या टोळीला अटक करण्यात आली. कोल्हापूर एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
या टोळीकडून 210 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व अन्य साहित्यासह 13 लाख 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या टोळीने फसवणूक केल्यानंतर अश्विनी आनंत आरेकर यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अटकेतील सहा संशयित कागल ते मुरगूड रोडवर पाटबंधारे कार्यालयासमोर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा लावण्यात आला होता.
पथकाने सचेनकुमार योगेंद्र साह (वय 38, रा. जदिया, ता. त्रिवेणगंज, जि. सुपोल (सध्या रा. कागल), बौआ राजू बडई (वय 25, रा. परमपार्क, ता. सोरबजार, जि. सारसा (सध्या रा. कागल), कुंदनकुमार जगदेव साह (वय 28, रा. जदिया, ता. त्रिवेणगंज, जि. सुपोल, धीरजकुमार परमानंद साह (वय 31, रा. जमुनिया, ता. परवत्ता, जि. भागलपूर, भावेश परमानंद गुप्ता (वय 35, रा.गोविंदपूर, ता.महेशखुंट, जि. खगडिया) आणि आर्यन अजय गुप्ता (वय 19, रा. जमुनिया, ता. परवत्ता, जि. भागलपूर, सर्व रा. बिहार) यांना अटक केली.
अटक केलेल्या टोळीकडून चोरीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, सोने पॉलिशसाठी लागणारे साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकल आढळल्या. ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता इतर दोन साथीदारांनी राधानगरी पोलिस ठाण्यात नोंद असलेला गुन्हा केल्याची कबूली दिली. तसेच हा मुद्देमाल विक्रीसाठी या टोळीकडे दिला होता. पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करताना अटकेतील सर्व आरोपी मदतीसाठी थोड्या अंतरावर थांबून होते.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सायबरचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.