राज्यपालांचे अधिकार तपासा : ठाकरे गटाची मागणी
नवी दिल्ली : खरा पंचनामा
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस सुनावणी होत आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिली आहे.
त्याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असून, त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.
याशिवाय एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. २१ जूनपासून ज्या घटना घडत आहेत. त्या घटनांचा क्रम सर्वोच्च न्यायालयाने तपासावा. यावर कशाप्रकारे कारवाई होऊ शकते, याकडे विशेष लक्ष द्यावे. राज्यपालांचे अधिकार देखील सर्वोच्च न्यायालयाने तपासावे. तसेच सरकार कसे स्थापन झाले, याची चौकशी न्यायालयाने करावी, अशी मागणी अनिल देसाई यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनिल देसाई म्हणाले, आयोगाचा निकाल धक्कादायक होता. सुनावणी सुरू असताना आयोगाने निकाल द्यायला नको होता. या निकालाचा सत्तासंघर्षावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
काल उद्धव ठाकरे यांनी देखील निवडणूक आयोगाव प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोग ज्या पद्धतीने अलोकतांत्रिक निर्णय घेत आहे, त्यावरून प्रश्न निर्माण होत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच निवडणूक आयोग बरखास्त करा.
न्यायाधीशांप्रमाणे निवडणूक आयुक्तांचीही नियुक्ती झाली पाहिजे, तोपर्यंत आयोगाचे काम सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.