'द काश्मीर फाईल्स' सर्वोत्कृष्ट चित्रपट!
मुंबई : खरा पंचनामा
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सोमवारी मुंबईत आयोजन करण्यात आले होते. सिनेसृष्टीतील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाने बाजी मारली. 'द काश्मीर फाईल्स'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. आलिया भट्टला 'गंगुबाई काठियावाडी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर रणबीर कपूरला 'ब्रह्मास्त्र'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुस्कार देण्यात आला.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 'द काश्मीर फाईल्स' हा सिनेमा दिग्दर्शित केला असून त्यांनीच निर्मितीही केली आहे. या सिनेमावरुन मोठा वादही झाला. सिनेमा राजकीय प्रोपगांडा असल्याचे अनेकांनी म्हटले होते. मात्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले. नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात 'द काश्मीर फाईल्स'ला 'बेस्ट फिल्म'चा पुरस्कार मिळवला.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुरस्कार स्वीकारताना म्हटले की " आयोजकांचे आभार. अनेक जणांनी एकत्र येत हा सिनेमा बनवला आहे. त्यामुळे हा लोकांचा सिनेमा आहे. मी हा पुरस्कार त्या सर्व हा लोकांचा सिनेमा आहे. मी हा पुरस्कार त्या सर्व दहशतवाद पीडितांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या भारतीयांना समर्पित करतो." यावेळी अनुपम खेर यांना 'मोस्ट व्हर्सेटाइल ऍक्टर' म्हणून पुरस्कार मिळाला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.