Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कसबा, चिंचवडची पोटनिवडणुक रद्द होण्याची शक्यता : ऍड. सरोदे

कसबा, चिंचवडची पोटनिवडणुक रद्द होण्याची शक्यता : ऍड. सरोदे 



पुणे : खरा पंचनामा 

पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप, महाविकास आघाडीसहित इतर पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. मात्र या दोन्ही पोटनिवडणुका रद्द होण्याची शक्यता असल्याचे मत ऍड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. 

कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. तर चिंचवडमधून भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे यांचीही जोरदार तयारी सुरु झाली आहे. 

घटनातज्ज्ञ सरोदे म्हणाले, शिवसेनेसंदर्भातील अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामध्ये जर १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होईल. विधानसभा भंग झाली तर मग निवडणुकीला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे पोटनिवडणूक रद्द होऊ शकते. आताची ही पोटनिवडणूक १४ व्या विधानसभेसाठी होणार आहे. १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होऊन राष्ट्रपती राजवट येईल,' असेही ते म्हणाले. 

त्यामुळे कसबा आणि चिंचवड या विधानसभा पोटनिवडणुकींचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. शिवसेनेतल्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, शिवसेना विधिमंडळ नेतेपदावरून एकनाथ शिंदेंना दूर करण्याचा पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांचा निर्णय, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावरून दाखल करण्यात आलेली याचिका, राज्यपालांनी सरकार स्थापनेचं दिलेलं निमंत्रण या आणि इतर मुद्द्यांसंदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. मागील महिन्यात याबाबत कोणताच निकाल समोर आलेला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही १४ फेब्रुवारीला होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.