Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एनआयएकडून मुंबई पोलिसांना 'अलर्ट'चा इमेल!

एनआयएकडून मुंबई पोलिसांना 'अलर्ट'चा इमेल! 



मुंबई : खरा पंचनामा 

एनआयएकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. मुंबईत सध्या एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये असल्याचं समजते. सरफराज मेमन असं या व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती परदेशात प्रशिक्षण घेऊन आलेली असून धोकादायक असल्याने सतर्क राहावं अशा सूचना एनआयएने केल्याचं सूत्रांनी सांगितले. त्यानंतर आता राज्यातल्या तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 

मुंबईत एक धोकादायक व्यक्ती फिरत असून त्यासंदर्भात माहिती देणारा ई-मेल एनआयएकडून मुंबई पोलिसांना करण्यात आला आहे. एनआयएकडून मुंबई पोलिसांनी पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये सतर्क राहण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. एनआयएने आपल्या ईमेलमध्ये 'धोकादायक' या शब्दाचा उल्लेख करत मुंबई पोलिसांना सतर्क राहायला सांगितलं आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने आपल्या ई- मेलमध्ये संशयित व्यक्तीचं नाव सरफराज मेमन असल्याचं सांगितलं असून ही व्यक्ती मुंबईत पोहोचली असल्याचं एनआयएने ई-मेलमध्ये म्हटलं आहे. मुंबईत फिरत असलेली संशयित धोकादायक व्यक्ती इंदूरची राहणारी असून या व्यक्तीने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतली आहे. त्यामुळे ही व्यक्ती खूपच धोकादायक ठरु शकते, असंही एनआयएने म्हटलं आहे. 

एनआयकडून मुंबई पोलिसांना करण्यात आलेल्या ई- मेलमध्ये या संशयित व्यक्तीची कागदपत्रही पाठवली आहेत. मेलसोबत एनआयएने आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि एलसी कॉपीही जोडल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांसोबतही संवाद साधत सविस्तर माहिती दिली आहे. 

मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ताजमहाल पॅलेस हॉटेल, ताज लॅण्ड्स एंड हॉटेल, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, मंत्रालय, मुंबईसह उच्च न्यायालय आणि इतर महत्वाच्या आस्थापनांसह सुरक्षा वाढली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.