Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आमच्याकडे तणनाशक, कमळ फुलणार नाही : राजू शेट्टी

आमच्याकडे तणनाशक, कमळ फुलणार नाही : राजू शेट्टी



कोल्हापूर : खरा पंचनामा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत राजू शेट्टी म्हणाले की, आमच्याकडेही फवारणी असून त्यामध्ये कमळ फुलणार नाही. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येणाऱ्या चक्काजाम आंदोलनाची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 22 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग वगळून अन्य मार्गांवर हे आंदोलन होईल, असे शेट्टी म्हणाले.

अवघ्या एक महिन्याच्या आत मोदी सरकारमधील तीन बड्या नेत्यांकडून कोल्हापूर दौरा होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जय्यत तयारी सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी 19 आणि 20 जानेवारी रोजी कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विकासकामांचा आढावा घेतला. 

यानंतर 28 जानेवारी रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर आले. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावाही पार पडला. यानंतर आता भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह 19 फेब्रुवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यातही कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.

दरम्यान, भाजपकडून सुरु करण्यात आलेल्या जोरदार तयारीनंतर दोन्ही मतदारसंघातील इच्छुक तसेच शिंदे गटाची सुद्दा धाकधूक वाढत चालली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मात्र भाजपच्या तयारीकडे आव्हान म्हणून न पाहता खोचक शब्दात टोला लगावला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.