दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक!
दिल्ली : खरा पंचनामा
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. दारु घोटाळा प्रकरणी सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. आठ तास चौकशी केल्यानंतर सिसोदियांवर अटकेची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, मनीष सिसोदियांची सीबीआयकडून चौकशी सुरू असताना आपच्या अनेक नेत्यांनी सीबीआय मुख्यालयाबाहेर आंदोलन केलं. मात्र मुख्यालयाबाहेर कलम १४४ लागू झाल्याने जवळपास ५० नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. आम आदमी पक्षाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या वक्तव्याचे पोस्टर जारी केले होते. दोन पानांच्या या पोस्टरवर मनीष सिसोदिया यांचा फोटोही छापण्यात आला होता.
खोट्या गुन्ह्यांची आम्हाला भीती वाटत नाही. आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती नाही. आम्ही भगत सिंह आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहे आणि आम्ही मृत्यूशी सामना करायलाच निघालोय असं सिसोदियांनी म्हटलं होतं.
सिसोदिया यांना अबकारी धोरण प्रकरणी सीबीआयकडून चौकशीला बोलावण्यात आलं होतं. तेव्हाच त्यांनी स्वत:च्या अटकेची शक्यता व्यक्त केली होती. तसंच तपास यंत्रणांना आपण सहकार्य करू असेही ते म्हणाले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.