Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत सव्वादोन लाखांची सुगंधी तंबाखू जप्त, दोघांना अटक : एलसीबीची कारवाई

सांगलीत सव्वादोन लाखांची सुगंधी तंबाखू जप्त, दोघांना अटक : एलसीबीची कारवाई 



सांगली : खरा पंचनामा 

सांगली शहरातील मार्केट यार्डजवळ असलेल्या महावीर उद्यान परिसरात सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सव्वादोन लाख रुपयांची सुगंधी तंबाखू, दोन चारचाकी गाड्या असा सव्वासात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

अमोल प्रकाश चिपरे (वय 35, रा. काननवाडी, ता. मिरज), असिफ चांदसो मुलाणी (वय 34, रा. दत्तनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी बेकायदा, प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे एक पथक तयार केले होते. 

हे पथक सांगली शहरात गस्त घालत असताना सुगंधी तंबाखू घेऊन दोन गाड्या मार्केट यार्ड परिसरातून जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने महावीर उद्यान परिसरात सापळा रचून दोन्ही गाड्या आणि त्यांच्या चालकांना ताब्यात घेतले. गाड्यांची झडती घेतल्यानंतर त्यात प्रतिबंधित असलेली तंबाखू सापडली. दोघांना अटक करून मुद्देमालासह विश्रामबाग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, चेतन महाजन, प्रशांत माळी, शशिकांत जाधव, संदीप नलावडे, दीपक गायकवाड, ऋतुराज होळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.