कारच्या धडकेत एपीआय ठार!
अलिबाग : खरा पंचनामा
भरधाव कारची मोटारसायकलला धडक बसून सहायक पोलीस निरीक्षक (API) दारासिंग पावरा ठार झाले. पावरा पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर होते. पोयानाड येथे कामानिमित्त जात असताना गुरुवारी सायंकाळी हा अपघात झाला.
पावरा यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर व पोलीस दलावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरुन पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दारासिंग पावरा हे मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील असून रायगड पोलीस दलात ते कार्यरत आहेत. नुकतेच त्यांना एपीआय पदावर बढती मिळाली होती. अलिबाग पोलीस मुख्यालयात ते कर्तव्य बजावत होते.
गुरुवारी सायंकाळी अलिबाग वडखळ रस्त्याने दुचाकीवरुन पोयनाड येथे जात होते. त्यावेळी मागून आलेल्या कारने त्यांच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली.
या धडकेत पोवरा रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना तातडीने अलिबाग जिल्हा रुग्णालायत दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरानी त्यांना मृत घोषीत केले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पावरा यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पावरा यांच्यावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.