Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मविआ नेते राज्यपालांच्या भेटीला!

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मविआ नेते राज्यपालांच्या भेटीला!



मुंबई : खरा पंचनामा

राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. याच दरम्यान महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज थेट राजभवन गाठत महाराष्ट्राचे नवनिर्नाचित राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलीय. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.

राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याआधी मुंबईत घडामोडींना वेग आलाय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

या अधिवेशनात सर्वसामान्य, गरीब जनता आणि शेतकऱ्यांचे मुद्दे मांडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याशिवाय राज्य सरकारला कोणकोणत्या मुद्द्यांवर घेरता येईल, याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

राष्ट्रवादी मविआच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलीय. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने अचानक राज्यपालांची भेट घेतल्याने या भेटीमागे नेमकं कारण काय असेल? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार जितेंद्र आव्हाड, अनिल परब, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील प्रभू असे आम्ही अनेकजण भेटायला आलो होतो. भेटीमागील कारण एवढंच होतं की, त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाचं आम्हाला निमंत्रण होतं पण त्यावेळी आम्ही मुंबईत नव्हतो. त्यामुळे त्यांना भेटता आलं नव्हतं. म्हणूनच आम्ही भेटायला आलो. अतिशय चांगली भेट झाली. सर्वांनी चर्चा केली, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी या भेटीबद्दल दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.