Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीच्या महापौरांना अंबारीसह हत्ती तर उपमहापौरसाठी घोडा खरेदी करणार!

सांगलीच्या महापौरांना अंबारीसह हत्ती तर उपमहापौरसाठी घोडा खरेदी करणार! 



सांगली : खरा पंचनामा 

सांगली महापालिकेच्या अभिरूप महासभेत महापालिका क्षेत्रात बिबट्या, गवा , सांभार या वन्य प्राण्यांचा पकडण्याचे टेंडर काढण्याचा आणि दक्षिण आफ्रिकेकडून चित्ते मागण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी महापौरांसाठी अंबारीसह हत्ती तर उपमहापौर यांच्यासाठी घोडा खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. या अभिरुप सभेचे पीठासीन अधिकारी तथा महापौर म्हणून आयुक्त सुनील पवार यांनी काम पाहिले तर आयुक्तांची भूमिका महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी बजावली. 

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी महापालिकेत अभिरुप महासभा पार पडली. या अभिरुप महासभेत प्रशासनाची भूमिका नगरसेवक तर नगरसेवक पदाधिकारी यांची भूमिका काहीवेळ प्रशासकीय अधिकारी सांभाळतात. ही अभिरुप सभा असल्याने या सभेत अनेक गमतीदार विषय पटलावर मांडले जातात आणि त्या विषयावर चर्चाही केली जाते. आज अभिरुप महासभेत महापालिका क्षेत्रातील नागरिकांना चंद्र व मंगळ ग्रहावर पर्यटनासाठी जानेकरिता महापालिकेच्या ओपन स्पेस मध्ये अंतराळ स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. 

महापालिका पदाधिकारी व नगरसेवकांना दुबई अभ्यास दौरा करण्यास पाठवण्याचा आणि येताना दुबईतून कंदील व दिवे आणण्यास मान्यता देण्यात आली. याच अभिरूप महासभेत महापौर यांच्यासाठी रोल्स रॉयल किंवा मर्सडीज बेंझ गाडी घेण्याच्या विषयाला नगरसेवकांनी विरोध केला तर या गाड्या नगरसेवकांच्या मानधनातून न घेता शासनाच्या निधीतून घेण्याची सूचना अभिरुप नगरसेवकांनी केली. यावर अभिरुप सभेचे महापौर सुनील पवार यांनी महापौरांना रोल्स रॉयल किंवा मर्सडीज बेंझ गाडी घेण्याऐवजी हत्ती अंबारीसह आणि उपमहापौर व अन्य पदाधिकारी यांच्यासाठी घोडे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महापालिकेच्या नगरसेवकांची नोंदणीकृत ठेकेदार वर्ग अ म्हणून नोंदणी करण्यासही मान्यता देण्यात आली. 

याच अभिरुप सभेत आयत्या वेळेत कृष्णा नदी कुपवाड कडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर अधिकाधिक आयत्या वेळचे विषय घ्यावेत आणि त्यावरच चर्चा करावी असे अभिरुप महासभेचे महापौर सुनील पवार यांनी जाहीर केले. या अभिरूप महासभेत प्रशासनाच्या जागेवर नगरसेवक पदाधिकारी तर नगरसेवक पदाधिकारी यांच्या भूमिकेत प्रशासकीय अधिकारी पाहायला मिळाले त्यामुळे या सभेमध्ये झालेले संवाद , विनोद आणि कानपिचक्या पाहता या अभिरूप महासभेत हास्यकल्लोळ पाहायला मिळाला. 

जागतिक दर्जाचे विषय सांगली महापालिकेच्या अभिरुप सभेत घेतल्यामुळे या चर्चांना आणखीनच रंगत आली. उपायुक्त राहुल रोकडे यांनी स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांची तर अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे यांनी उपमहापौरांची भूमिका बजावली होती. उपायुक्त स्मृती पाटील यांनी नगरसेविका रोहिणी पाटील यांची तर नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांची भूमिका बजावली. नगरसचिव म्हणून नगरसेविका अनारकली कुरणे यानी तर गटनेत्या म्हणून मनीषा जासूद यानी काम पाहिले. काँग्रेस नगरसेविकेची भूमिका भाजपाच्या नगरसेविका भारती दीगडे यांनी तर काका हलवाई यानी विरोधीक्षनेते संजय मेंढे यांची तर नकुल जकाते यांनी शेखर इनामदार यांची भूमिका बजावली. नगरसेवक अभिजित भोसले यांनी आरोग्याधिकारी आंबोळे आणि ताटे अशी दुहेरी भूमिका तर नगरसेवक योगेंद्र थोरात यानी सहायक आयुक्त अशोक कुंभार यांची भूमिका बजावली. नगरसेवक विष्णु माने आणि उपायुक्त राहुल रोकडे यांची तर जगन्नाथ ठोकळे यानी शहर अभियंता आप्पा अलकुडे यांची भूमिका बजावली. 

नगरसचिव चंद्रकांत आडके यानी नगरसेवक विष्णु माने यांची भूमिका तर नगरसेविका शुभांगी साळुंखे यांनी नगरसचिव विभागाच्या लिपिक मशिषा जासूद यांची भूमिका बजावली. पाणी पुरवठा विभागाचे मुद्दसर जाफर यानी नगरसेवक विजय घाडगे तर दिनेश जाधव यांनी कुपवाडचे नगरसेवक म्हणून भूमिका बजावली. महिला नगरसेविका म्हणून सहायक आयुक्त उज्वला शिंदे आणि जयश्री व्हावळ यांनी काम पाहिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.