सांगलीत विवाहित तरुणीची प्रेम जाळ्यातून सुटका! : पोलिसांची महत्वाची भूमिका
सांगली : खरा पंचनामा
एका वीस वर्षीय तरूणीचा दोन वर्षापुर्वी विवाह झाला होता. तो तिच्या इच्छेविरूद्ध झाल्याचे तिने पोलिसांसमोर सांगितले. दरम्यानच्या काळात ती तरूणी शिक्षणासाठी सांगलीत आली. त्यावेळी तिची सोशल मीडियावर एका तरूणाची ओळख झाली. दुसऱ्या धर्मातील त्या तरूणाशी तिचा संपर्क झाला. कालांतराने त्यांचे प्रेम जुळले. इथवरच्या प्रवासानंतर त्या तरूणीच्या कुटुंबियांनी हा सारा प्रकार त्यांच्या संबंधित समाजाच्या काहींसमोर मांडला. त्यांनी आग्रही भूमिका घेतल्याने दोघेही पोलिस ठाण्यात आले. अखेर समुपदेशनानंतर त्या युवतीची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. त्या मुलीची प्रेम जाळ्यातून सुटका करण्यात आली. यात सांगली शहर पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली.
त्या युवतीचा दोन वर्षापुर्वी तिच्या मनाविरुद्ध विवाह झाला होता. नंतर ती शिक्षणासाठी सांगलीत आली. सोशल मीडियावर तिची सांगलीतील तरूणाची ओळख झाली. तो दुसऱ्या धर्मातील असूनही त्यांचे प्रेम जुळले. त्या विवाहित तरुणीचे कुटुंबिय परगावी जाणार होते. मात्र, त्यावेळी ती निघून गेली. ती बेपत्ता झाल्याची फिर्याद कुटुंबिय शहर पोलिस ठाण्यात देण्यासाठी आले. मात्र, तोवर हा सारा प्रकार समोर आला. त्यानंतर दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले.
समुपदेशनानंतर त्या तरुणीची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी समुपदेशनाच्या भूमिकेत राहुन हे प्रकरण हाताळले. त्यामुळे सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांचे दोन्ही बाजूच्या लोकांनी आभार मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.