Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाण्यात 10 लाखांची एमडी पावडर जप्त, तिघांना अटक

ठाण्यात 10 लाखांची एमडी पावडर जप्त, तिघांना अटक 



ठाणे : खरा पंचनामा 

ठाणे येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने तिघांना अटक करत 10 लाखांची एमडी पावडर जप्त केली. कमरूजमान गुलाम मोहम्मद शेख उर्फ कमर, मोहम्मद शरीफ अब्दुल हाफिज शेख उर्फ पापा, वसीम अन्वर बाज उर्फ लाला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

गोपनीय माहितीच्या आधारे अंमली विरोधी पथकाने कमरूजान याला अटक केली. त्याच्या चौकशीत पोलीस पथकाने मोहम्मद शरीफ अब्दुल हाफिज शेख, उर्फ पापा व आणखीन दोन आरोपीना बेड्या ठोकून एकूण १० लाख ५२ हजार ३८० रुपये किंमतीचे १२६.७७ ग्राम एमडी जप्त केले आहे. कमरूजमान शेख उर्फ कमर हा अंमली पदार्थ जवळ बाळगून विपुल लॉज समोरील मुन्ना पनवेल रोड, दहीसर मोरी गाव, ठाणे येथे फिरत असताना सापळा रचलेल्या पोलीस पथकाने त्याला अटक केली. त्यांच्या अंगझडतीत ५५ ग्राम ३ ग्राम एमडी पोलीसांना आढळली. 

त्याने चौकशीत सदरची एमडी पावडर मोहम्मद शरीफ अब्दुल हाफिज शेख उर्फ पापा याचे नाव सांगताच पोलिसांनी त्याला कौसा मुंब्रा ठाणे येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६० ग्रॅम एमडी जप्त केला. दरम्यान चौकशीत वसीम अन्वर बाज उर्फ लाला हे नाव पुढे आले. पोलीस पथकाने आरोपीच्या माहितीवरून वसीम अन्वर याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे ११.७४ ग्राम एमडी सापडले. 

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडक कारवाईत पोलीसांनी विक्री चेनमधील तिघांना अटक करून, १० लाख ५२ हजार ३८० रुपयांचा १२६ ग्राम आणि ७७ मिलीग्राम एमडी पावडर हस्तगत करण्यात यश मिळवले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.