कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेसाठी मतदान
नवी दिल्ली : खरा पंचनामा
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यासोबतच कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे.
कर्नाटकात 2018-19 मध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 9.17 लाखांनी वाढली आहे. 1 एप्रिलपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे सर्व तरुण मतदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करु शकतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5 कोटी 21 लाख 73 हजार 579 नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात 58 हजार 282 मतदान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल आहे.
उमेदवारी अर्ज छाननी 21 एप्रिलला होईल. 24 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. दि. 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
कर्नाटकमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. भाजपने 224 जागांपैकी 104 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 80 जागा आणि जेडीएसने 37 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या आमदारांनी बंड केलं आणि भाजपमध्ये सामील झाले. कर्नाटकात सध्या भाजपकडे 119 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 75, तर मित्रपक्ष जेडीएसकडे एकूण 28 जागा आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.