ईडीचे मुंबई, नागपुरात 15 ठिकाणी छापे : कोट्यवधींचे दागिने, रोकड जप्त
मुंबई : खरा पंचनामा
ईडीने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. नागपुर आणि मुंबईसह ईडीने तब्बल १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यात ५.५१ कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि १.२१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या बद्दलचे ट्विट करत ईडीने कारवाईची माहिती दिली आहे.
ईडीच्या छाप्यांमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. नागपूरचे अनेक स्टील, लोह आणि रिअल इस्टेट व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर त्यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये ५.५१ कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि १.२१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर अधिक तपास सुरू असल्याची माहिती ईडीने दिली आहे.
या १५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या सर्वांचा तपास सुरू आहे. याशिवाय अनेकांची फसवणूक करणाऱ्या पंकज मेहाडियाच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे.
ईडीने कारवाई केलेला पंकज मेहाडिवर व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तो नागपूरच्या रामदासपेठ परिसरात राहतो. त्याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. २०२१ मध्ये यांना तुरुगातही पाठवण्यात आले होते. यानंतर काल ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.