Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील व्यक्तीचा पॅन क्रमांक वापरून दिल्लीत 18 कोटींचा जीएसटी घोटाळा

सांगलीतील व्यक्तीचा पॅन क्रमांक वापरून दिल्लीत 18 कोटींचा जीएसटी घोटाळा



दिल्ली : खरा पंचनामा

जीएसटी विभाग शेकडो कोटींचे घोटाळे उघडकीस आणत असतानाच आणखी नवनवीन फंडे वापरून घोटाळेबाज यंत्रणेस कामाला लावत आहेत. वर्षअखेर संपत असताना सांगलीतील एका व्यक्तीस आयकर विभागाकडून आलेल्या  नोटीसीत त्याने दिल्ली येथे सप्टेंबर 22 ते डिसेंबर 22 या दरम्यान सुमारे 18 कोटीचा व्यवसाय केला असल्याचे नमूद केले आहे. ही नोटीस पाहून सदर व्यकी चक्रावली. त्या व्यक्तीने कधीही कोठेही कोणतीही वस्तूंची विक्री केली नव्हती. सांगलीतील त्या व्यक्तीने त्या नोटीस आणि विक्रीच्या व्यवसायाबाबत अधिक चौकशी केली असता दिल्ली येथे त्याचा पॅन क्रमांक वापरून घोटाळेबाज व्यक्तीनं 18 कोटीचा व्यवसाय करून सुमारे 3.5 कोटी रूपयांच्या जीएसटीची चुकवेगीरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सांगली जिल्हयात यापूर्वी विजयनगर येथे गुजरातमधील व्यापाऱ्याने खोबरं विक्री दाखवुन विभागास 4 कोटींचा चुना लावला होता. तसेच जत मध्येही एका शेत मजुराच्या आधार, पॅन कार्डचा वापर करून कोट्यवधी रूपयांची बोगस विक्री दाखवुन जीएसटी चोरी केली होती. याचे पुढे काय झाले हे अद्यापही समजले नाही.

यामुळे आता प्रत्येक पॅन नंबर करदात्याने आपल्या नंबरचा गैरवापर होत नाही ना हे महिन्या-दोन महिन्याच्या अंतराने नियमितपणे तपासण्याची गरज आहे. या साठी gst.gov.in या संकेस्थळावर टॅक्स पेयर सर्च मध्ये पॅन क्रमांक टाकला असता त्यास संलग्न जीएसटी क्रमांक समजतो. त्याच बरोबर सध्या सर्वसामान्य करदात्याना जीएसटी क्रमांकासाठी  आधारसह अनेकस्तरीय पडताळणी करणे आवश्यक असून ही अशा गोष्टी वारंवार समोर येत आहेत ही आश्चर्याची बाब आहे. त्यामुळे व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार यांच्यासह पॅन कार्ड वापरणाऱ्या सवार्नीच याबाबत सतर्क राहणे आवश्यक असल्याचे जीएसटी विभागामाफर्त सांगण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.