बेरोजगारांना दोन वर्षे 3 हजारांचा भत्ता देणार : राहुल गांधी
बेळगाव : खरा पंचनामा
"बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काहीही करत नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा 3 हजार रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी दीड हजार रुपये प्रति महिना देणार आहे, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. कर्नाटकातील बेळगाव येथे निवडणूक सभेला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकसाठी केलेली सर्वात मोठी घोषणा म्हणजे दोन वर्षांसाठी बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3,000 रुपये देण्याची. राहुल गांधींनी कर्नाटकात 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणाही केली आहे. यासोबतच 10 लाख खासगी नोकऱ्या देण्याचे आणि 2.5 लाख रिक्त सरकारी पदे भरण्याचे आश्वासन राहुल गांधींनी दिले आहे.
गांधी म्हणाले, कर्नाटकमधील भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. कोणतेही काम करण्यासाठी 40 टक्के कमिशन घेतले जाते. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने पंतप्रधानांना पत्र लिहिले, पण त्यांनी काहीच केले नाही. भाजपच्या आमदाराच्या मुलाकडून आठ कोटी रुपये जप्त करण्यात आले मात्र कारवाई झाली नाही.
राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास दहा लाख तरुणांना रोजगार दिला जाईल आणि अडीच लाख सरकारी पदेही भरली जातील, अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी केली. महिलांना दरमहा दोन हजार रुपये आणि गरीब कुटुंबांना दहा किलो तांदूळ देणार असल्याचंही ते म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.