Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

किणीजवळ 35 लाखांची बनावट विदेशी दारू जप्त

किणीजवळ 35 लाखांची बनावट विदेशी दारू जप्त



कोल्हापूर : खरा पंचनामा

बनावट विदेशी दारूचे बॉक्स मुंबईच्या दिशेने घेऊन जाणारा कंटेनर पकडून ३५ लाख ५३ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुणे-बंगळुरू महामार्गावर किणीजवळ गुरुवारी सकाळी कारवाई केली. कंटेनरचालक दिनेश जेकनराम कुमार (वय ३०, रा. कावोकी बेरी, जि. बाडमेर, राजस्थान) याला पथकाने अटक केली आहे.

पुणे-बेंगळुरू महामार्गावरून एका सहाचाकी कंटेनरमधून बनावट विदेशी दारू मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त डॉ. तडवी यांना मिळाली होती. त्यानुसार तडवी यांनी निरीक्षक एस. जे. डेरे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. 

महामार्गावर किणी गावाजवळ दबा धरून बसलेल्या पथकाने गुरुवारी सकाळी एक संशयित वाहन अडवले. त्याची झडती घेताना विदेशी मद्याचे ४०० बॉक्स आढळले. पथकाने ३५ लाख ५३ हजार २०० रुपयांचे मद्य आणि ११ लाख रुपयांचा कंटेनर असा ४६ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कंटेनर चालक दिनेश कुमार याला अटक केली असून, मद्यसाठा कुठून आणला आणि कोणाला पाठवला जाणार होता, याचा तपास सुरू असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.