संशयिताकडून 50 हजार घेतल्याने पोलीस उपनिरीक्षक निलंबित
पुणे : खरा पंचनामा
गुन्हा दाखल असलेल्या संशयितांकडून पन्नास हजार रूपये उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. अरविंद शिंदे असे निलंबित झालेल्या पोलीस उपनिरिक्षकाचं नाव आहे. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात अरविंद शिंदे कार्यरत आहेत. डहाणूकर पोलिस चौकी येथे ते अधिकारी म्हणून काम पाहत होते.
आता लाच मागितल्याप्रकरणी आणि कामात कसूर केल्याबाबत त्यांनी निलंबित करण्यता आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग राजेंद्र डहाळे यांनी शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. दि. ९ मार्च रोजी, त्यांनी निलंबनाबाबत आदेश काढले होते. घराच्या मालकी हक्कसंबंधी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील संशयिताला शिंदे यांनी फोन करून पोलीस चौकीत हजर राहण्यास सांगून, 50 हजार रूपये घेतल्याचे समोर आले होते. तसेच हे प्रकरण दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे तपासासाठी असताना, आरोपींना धाक दाखवून शिंदे यांनी पैसे घेतले.
शिंदे यांच्यावर आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, तसेच पोलीस विभागाची प्रतिमा खराब केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अरविंद शिंदे यांनी पोलिस पदावर कार्यरत राहून, महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील तरतूदी व नियमांचा भंग केला आहे. यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा खराब झाली आहे. शिंदे यांना आता निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांना खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही, असे निलंबनाच्या कारवाईत म्हटले आहे. अलंकार पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निलंबन काळातमध्ये खाजगी नोकरी किंवा धंदा करत नसल्याचे, प्रमाणपत्र द्यावे लागेल. असे प्रमाणपत्र दिल्यानंतरच त्यांना निर्वाह भत्ता दिला जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.