राज्य उत्पादन शुल्ककडील 6 निरीक्षकांच्या राज्याअंतर्गत बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील 6 निरीक्षकांच्या राज्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश सोमवारी काढण्यात आले आहेत.
ठाण्यातील उल्हासनगर येथील निरीक्षक अनिल पवार यांची डी विभाग पुणेकडे बदली करण्यात आली आहे. पुण्याच्या हडपसर येथील निरीक्षक रमेश बिराजदार यांची ए विभाग ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. चाळीसगावच्या पाचोरा येथील बाळासाहेब जाधव यांची उल्हासनगर, ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.
एफ विभाग नागपूरचे निरीक्षक विजयकुमार थोरात यांची मुंबईतील राज्य भरारी पथकाकडे बदली करण्यात आली आहे. पुण्याच्या विघ्नहर कारखाना येथील निरीक्षक जयवंत पाटील यांची जी विभाग मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. नाशिकच्या करंजाळी तपासणी नाका येथील मंगेश कावळे यांची एफ विभाग नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे तसेच बदलीचे आदेश तात्काळ अंमलात आणण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.