निवृत्त एसीपीला 60 लाखांचा गंडा घालून उकळली खंडणी
पुणे : खरा पंचनामा
पुणे जिल्ह्यातील भोर येथे स्वस्तात शेतजमीन घेऊन देतो, असे सांगून एका निवृत्त एसीपीकडून ६० लाख रुपये घेऊन जमीन न देता फसवणूक करण्यात आली. पैसे परत मागितल्यावर त्या एसीपीलाच धमकावून ६ लाख रुपयांची खंडणीही उकळण्यात आली. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश अंकुश पोटे, संदेश अंकुश पोटे, प्रियांका निलेश सूर्यवंशी (सर्व रा. कुदळे पाटील रेसिडेन्सी, वडगाव बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निवृत्त एसीपीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०१५ पासून सुरु होता.
राजेश पोटे, संदेश पोटे व प्रियांका सूर्यवंशी यांनी एसीपीचा विश्वास संपादन करुन भोर येथे स्वस्तात जमीन विकत घेऊन देतो, असे सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून ६० लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना कोणती जमीन खरेदी करुन दिली नाही. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांच्या भोसलेनगर येथील राहत्या घरी येऊन त्यांना पैसे देत नसल्याचे धमकावले. आर्थिक नुकसान करण्याची भिती घातली.
ते एसीपी असताना मार्च २०२१ मध्ये आणखी ६ लाख रुपयांची खंडणी घेतली. या पोलीस अधिकाऱ्याने निवृत्त झाल्यानंतर आता याप्रकरणी तक्रार अर्ज दिला असून त्यानुसार फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.