Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

टायगर अभी जिंदा है...!

टायगर अभी जिंदा है...! 



मुंबई : खरा पंचनामा 

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. हे अधिवेशन देखील वादळी ठरत आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर उद्या प्रथमच जयंत पाटील अधिवेशनात सहभागी होणार आहेत. 

त्यांच्या समर्थकांनी सरकारला डिवचलं आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये सहभागी झाल्यानंतर जयंत पाटील काय बोलणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. दुसरीकडं निलंबनानंतर जयंत पाटील हे अधिवेशनात प्रथमच सहभागी होणार असल्यानं त्यांच्या समर्थकांकडून सरकाला डिवचणारे व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहेत. 

टायगर अभी जिंदा है म्हणत जंयत पाटलांच्या समर्थकांकडून हे व्हिडीओ व्हायरलं करण्यात आले आहेत. सोशल मीडियावरही हे व्हिडीओ व्हायरल करण्यात आले आहेत. सध्या राजकीय वर्तुळात याच व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.