पिंपरीत वसंतदादा यांना महापालिकेतर्फे आदरांजली
पिंपरी : खरा पंचनामा
पद्मभूषण वसंतदादा पाटील हे थोर स्वातंत्र्यसैनिक, शैक्षणिक क्रांतीचे पुरस्कर्ते, सहकार क्षेत्रातील अग्रणी, राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास, उद्योग विकास साधण्याचे यशस्वी प्रयत्न केले असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या सांगवी येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भोसले, दत्ता नळावडे, बाळासाहेब कांबळे, अशोक लंगडे, माऊजीभाई सापदिया, चमल चौथानी आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.