Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पटलं तर मत द्या, फार लोणी लावणार नाही : नितीन गडकरी

पटलं तर मत द्या, फार लोणी लावणार नाही : नितीन गडकरी 



नागपूर : खरा पंचनामा 

वेस्ट लँडवर होणारे अनेक प्रयोग मी जिद्दीने करतो. प्रेमाने करतो. नाही तर ठोकून करतो. मी लोकांनाही सांगून टाकलं. पुष्कळ झालं. लोकांनो तुम्हाला पटलं तर मतदान करा. किंवा नका करू मतदान. आता मी लोणी लावायला तयार नाही. मला पुष्कळ कामे करायची आहेत, असे रोखठोक मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. 

नागपुरात वनराई फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ग्रामीण भारताचे चित्र बदलण्यासाठी जलसंवर्धनापासून वेस्टलॅन्डपर्यंतचे प्रयोग मी जिद्दीने करत असतो. वेस्ट लँडवर होणारे अनेक प्रयोग मी प्रेमाने करतो, नाहीतर ठोकून करतो. मी आता लोकांना पण सांगितलं की, तुम्हाला पटलं तर मत द्या, नाहीतर देऊ नका. मी आता फार लोणी लावत नाही. तुम्हाला वाटलं तर ठीक आहे, नाहीतर कोणी नवीन येईल. कारण मला या कामात आता जास्त वेळ द्यायचा आहे. यामुळे भविष्य बदलू शकतं, असं नितीन गडकरी म्हणाले. 

पाण्यातून हायड्रोजन निघेल असं मी सांगत होतो. पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. कुणाचा विश्वास बसत नव्हता. माझ्या घरच्यांचाही विश्वास बसत नव्हता. मग मी विक्रम किर्लोस्कर यांना फोन केला आणि हायड्रोजनवर चालणारी गाडी मागितली. ते म्हणाले, आपल्याकडे गाडी नाहीये. जपानमध्ये आहे. मी म्हणालो, जपानहून मागवं. माझ्या दारात उद्या गाडी पाहिजे. कारण मी लोकांना पाण्यातून हायड्रोजन निघेल असं सांगतो आणि लोक विश्वास ठेवत नाही. त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून गाडी पाहिजे. 

ती गाडी आली. मी त्या गाडीने फिरतो. संसदेत जातो. लोक म्हणतात हायड्रोजनवर चालणारी गाडी आली. आता लोक माझ्यासोबत सेल्फीही काढतात, असा किस्साही त्यांनी सांगितला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.