Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट, मुंबईच्या एकावर गुन्हा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट, मुंबईच्या एकावर गुन्हा



नागपूर : खरा पंचनामा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या मुंबईतील तरुणाविरोधात नागपुरमधील लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्थक कपाडी असं या तरुणाचं नाव आहे. तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे ट्वीट 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहेत. सार्थक कपाडी या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते अतुल भातकळकर, आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे या सर्वांच्या विरोधात एकानंतर एक आक्षेपार्ह ट्वीट केले होते. नागपुरातील काही भाजप कार्यकर्त्यांनी ते ट्विट पाहिले आणि त्यानंतर रात्री उशिरा लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांनी तक्रार दिली होती. त्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांनी सार्थक कपाडीला अटक करण्याची तयारी केली आहे. अतिशय अर्वाच्च आणि आक्षेपार्ह भाषेत हे ट्वीट करण्यात आले होते. सार्थक कपाडी ट्विटर हॅण्डल स्वत: वापरतो की त्याच्या नावाने फेक ट्विटर हॅण्डल तयार करण्यात आलं आहे की हे अकाऊंटच फेक आहे, याचा सायबर पोलिसांकडून तपास सुरु आहे.

सुरुवातीला भाजपला या ट्वीटबद्दल कल्पनाच नव्हती. सार्थक कपाडी याचं ट्विटर हॅण्डल फॉलो करणाऱ्या भाजपच्या महिला कार्यकर्त्याने हे ट्वीट पाहिले. त्यानंतर त्यांनी आमदार कृष्ण खोपडे यांना संबंधित ट्वीट पाठवले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.