सांगली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगचा इन्शुरन्स कंपनीला दणका!
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील आरग येथील मंगल नारायण पाटील यांच्या मुलाचे रस्ता अपघात होऊन निधन झाले होते. त्यांच्या मुलाने हिरो कंपनीची मोटारसायकल विकत घेतली होती व त्यासोबतच हिरो गुडलाईफचे कार्ड देखील घेतले होते. सदर कार्ड सोबत 2 लाखाचा अपघाती विमा होता.
परंतु विमा कंपनीने केवळ 1 लाखच दिले त्यामुळे तक्रारदार यांनी ॲड. मोहसीन आयुब शेख यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगकडे विमा कंपनी विरुद्ध तक्रार दाखल केली होती.
सदर तक्रार मध्ये तक्रार आयोगाचे अध्यक्ष मुकुंद दात्ये, सदस्य अशफाक तांबोळी व नीलांबरी देशमुख या आयोगाने तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देत विमा कंपनीस 30 दिवसांचा आत रक्कम देण्याचे आदेश दिले. परंतु तक्रारदार यांनी विम्याची रक्कम देण्यात कसूर केल्याने तक्रारदार यांनी त्यांच्या विरुद्ध ॲड. मोहसीन आयुब शेख यांच्या मार्फत नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे सांगली येथील कार्यालय मधील मुद्देमाल, जंगम वस्तू जप्ती वसुलीचा वॉरंट अर्ज दाखल केला होता.
त्यानुसार आयोगाने कंपनीच्या सांगली येथील कार्यालय मधील मुद्देमाल जप्ती करण्याचे आदेश पारित केला व त्यानुसार नॅशनल इन्शुरन्स विमा कंपनी वर जप्तीची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई बेलीफ इकबाल मणेर यांच्या मार्फत करण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.