लोकसभा, विधानसभा निवडणूक मविआ एकत्र लढविणार : राऊत
दिल्ली : खरा पंचनामा
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवायचं ठरल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. गुरुवारी रात्री महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. ते दिल्लीत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितलं. रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील उपस्थित होते अशी माहितीही राऊतांनी दिली. या बैठकीत आणखी काही भूमिका ठरल्याचे राऊत म्हणाले.
सध्या राज्यातील आणि केंद्रातील सरकार जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण चालू आहे. आता प्रत्येक ठिकाणी जात दाखवण्याचे काम राज्य करत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.