मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीचे छापे
कोल्हापूर : खरा पंचनामा
कागल शहरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी शनिवारी पहाटे ईडीने मोठ्या पोलीस बंदोबस्तात छापा टाकला.
मुंबई मधून पोलिसांचे पथक आले आहे तर वीस ते पंचवीस अधिकारी चौकशीसाठी निवासस्थानात दाखल झाले आहेत.
यावेळी शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर जमा झाले आहेत. कार्यकर्त्यांकडून ईडीच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला जात आहे. तसेच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत.
आमदार हसन मुश्रीफ यांचे कनिष्ठ बंधू अनवर मुश्रीफ यांच्या घरीही अधिकाऱ्यांनी जाऊन चौकशी सुरू केली आहे. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी त्यांची दोन मुले नाविद आणि आबिद आहेत. तर आमदार हसन मुश्रीफ निवासस्थानी नसल्याचे समजते.
ईडीचे घरातील कामगारांचे देखील अधिकारी जबाब नोंदवत आहेत. निवासस्थानासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी शांत राहावे आम्ही जबाब नोंदवून झाल्यानंतर जाणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगितल्याचे समजते.
आमदार हसन मुश्रीफ यांचे कनिष्ठ बंधू अनवर मुश्रीफ यांच्या घरी देखील अधिकाऱ्यांनी जाऊन चौकशी केली तसेच जुन्या घरात देखील अधिकारी गेले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.