शिंदे सरकार कोसळणार, गेलेले आमदार परत येणार : राऊत
मालेगाव : खरा पंचनामा
आम्हीच खरी शिवसेना आहोत. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार आहे. भाजपासोबत गेलेले आमदार लवकरच आमच्याकडे परत येतील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. मालेगाव येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
राऊत म्हणाले, एखाद्याला गाडायचे ठरवले तर मी गाडतोच. इलेक्शन कमिशनला विचारून बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नाही. जनतेने बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनाप्रमुखपद दिले. इलेक्शन कमिशनचा बाप जरी आला तरी शिवसेना आणि धनुष्यबाण काढू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
संजय राऊत यांच्या नाशिक व मालेगाव येथे सभा झाल्या.
ते म्हणाले की, मला मालेगावला यायचेच होते. प्रकृती बरी नव्हती तरीही मी आलो. कारण मी ठरवले होते. जेव्हा मी ठरवतो की, एखाद्याला गाडायचे, तेव्हा ते मी करतोच. मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंची जंगी सभा 26 तारखेला होणार आहे. त्यावेळी शिवसेनेची खरी ताकद दिसेल.
राऊत म्हणाले, शिवसेना गत 55 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली, त्यांना मुख्यमंत्री, पंतप्रधान व्हायचे नव्हते. मराठी माणसांना सन्मान, स्वाभिमानाने जगता यावे यासाठी त्यांनी शिवसेना उभारली.
जनतेने बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखपद दिले. इलेक्शन कमिशनला विचारून शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली नाही. इलेक्शन कमिशनचा बाप जरी आला तरी शिवसेना आणि धनुष्यबाण काढू शकणार नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.