शहीद मॅरेथॉनमध्ये फॉरेन ईलाईट गटात योसेफ अबेबे ठरला विजेता!
सांगली : खरा पंचनामा
सांगलीत रविवारी झालेल्या शहीद मॅरेथॉन स्पर्धेत २१ किलोमीटर फॉरेन ईलाईट गटात योसेफ अबेबे विजेता ठरला. तर जेम्स कोरीर याने द्वितीय क्रमांक मिळवला. ताये टिरेफा याने तृतीय क्रमांक मिळवला.
इंडियन इलाईट पुरुष गटात प्रथमेश परमारकर याने प्रथम तर अब्दुल सलाम याने द्वितीय तर मोनू सिंग याने तृतीय क्रमांक मिळवला. महिला गटात भक्ती पोटे हिने प्रथम, मधुराणी बनसोडे हिने द्वितीय तर आरती कांबळे हिने तृतीय क्रमांक मिळवला.
२१ किमी स्पर्धेचा प्रारंभ पहाटे ५.३० वाजता झाला. मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून उद्घाटन झाले. विश्रामबाग चौक ते मिरजेतील गांधी चौकातून वळून पुन्हा त्याच मार्गे विश्रामबाग, मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राम मंदिर चौक, कॉंग्रेस भवन, स्टेशन चौक, कापड पेठ, टिळक चौक, आयर्विन पूलानजीक वळून पुन्हा विश्रामबाग चौक असा मार्ग होता. तर ५ किमी स्पर्धेसाठी विश्रामबाग चौकातून मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राम मंदिर चौकातून वळण घेत पुन्हा त्याच मार्गे विश्रामबाग चौकात स्पर्धा संपली. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पारितोषिक वितरण समारंभ झाला.
अंध, मूकबधीर, गतीमंद यासह दिव्यांगासाठी संयोजकांनी मोफत प्रवेश देत धावण्यासाठी वेगळ्या ट्रॅकची सोय केली होती. साताऱ्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य रोहित पाटील, उद्योजक गिरीश चितळे, महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहूल रोकडे व स्मृती पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मॅरेथॉन कमिटीचे चेअरमन समीत कदम, रेस डायरेक्टर डॉ. चंद्रशेखर हळिंगळे, शहीद फाऊंडेशनचे इनायत तेरदाळकर यांच्यासह योगेश रोकडे, श्रीकांत कुंभार, प्रदीप सुतार, सुधीर भगत, देवदास चव्हाण, अभिजित भोईटे, दीपक पाटील, महेश ढोले, आदित्य लोखंडे, तेजस डांगे, अजित दुधाळ, संतोष जाधव, वीरेन हळिंगळे, पवन कुंभार, स्वप्निल माने, जयदीप घाडगे, दादासाहेब बंडगर यांच्यासह पदीधिकाऱ्यांनी संयोजन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.