माजी पंचायत समिती सदस्यासह त्याच्या साथीदारांना कारावास
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील मालगाव येथे एकाला धमकावून हवेत गोळीबार करून त्याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी पंचायत समितीचा माजी सदस्य प्रकाश उर्फ बाळासाहेब तुकाराम भंडारे (रा. मिरज) याच्यासह त्याच्या साथीदारांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे ॲड. विनायक देशपांडे यांनी काम पाहिले.
पंचायत समिती माजी सदस्य प्रकाश उर्फ बाळासाहेब भंडारे व त्याच्या साथीदारांनी वसंत खांडेकर यांना तुम्ही समाजातील आमचे वर्चस्व कमी करताय काय, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून रिव्हॉल्व्हर छातीवर रोखून धमकावून त्यानंतर हवेत गोळीबार केला होता. तर रमेश तेलकिरे याने तलवारीने तोंडावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
भंडारे यांच्या अन्यसाथीदारांनी समाज मंदिरासमोर असलेल्या साहित्याची तोडफोड करून नुकसान केले होते. ही घटना 2012 मध्ये घडली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक के. बी. गवळी यांनी याबाबत तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणावरील सुनावणीत भंडारे व त्याच्या साथीदारांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच भंडारे यास हत्यार बाळगल्या प्रकरणी आर्म ॲक्ट प्रमाणे तीन वर्षे सक्त मजुरी व पाचशे रुपये दंड अशी स्वतंत्रपणे वेगवेगळी शिक्षा ठोठावली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.