अवैध दारूबाबत माहिती देणाऱ्यास बक्षीस देऊ : देसाई
मुंबई : खरा पंचनामा
पोलिसांच्या धर्तीवर माहिती देणाऱ्यांचे जाळे उभारण्याची योजना आखली आहे. हे माहीतगार जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू धंद्याची माहिती देणार आहेत. जो कोणी माहिती देईल त्याला बक्षीस रक्कम मिळू शकते, अशी घोषणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळात आज केली.
देसाई म्हणाले, महाराष्ट्र सरकार अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी माहिती देणाऱ्यांचे जाळे उभारण्याचा विचार करत आहे. अजित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना देसाई यांनी ही घोषणा केली. प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारत पवार यांनी अवैध दारूचा व्यवसाय रोखण्यासाठी राज्याचे उत्पादन शुल्क विभाग माहिती देणाऱ्यांचे जाळे तयार करू शकते असे सुचवले आणि त्या खात्याचे मंत्री असताना यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा झाली होती.
अवैध दारू धंद्यामुळे राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडत असल्याने गरज पडल्यास लाखो रुपये या माहिती देणाऱ्यांना देता येईल, असेही ते म्हणाले. यावर देसाई म्हणाले की, माहिती देणाऱ्यांचे जाळे उभारण्याबरोबरच एखाद्या भागात अवैध दारूविक्रीचे प्रकरण उघडकीस आल्यावर जिल्हास्तरीय अधिकाऱ्याला जबाबदार ठरवण्याचा पर्यायही सरकार विचारात घेत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.