पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांची मनसे कार्यालयास भेट
मुंबई : खरा पंचनामा
आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे कार्यालयास भेट दिली आहे. मनसेच्या मेळाव्याच्या आधी काही तास मुख्यमंत्र्यांनी मनसे कार्यालयास भेट दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीमुळे चर्चाना उधाण आले आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीमधील मनसेच्या कार्यालयात आले होते. मुख्यमंत्र्यांनी विनंतीला मान दिला. ते कार्यालयात आल्यानं आनंद झाला. हिंदुत्वाचा विचार आमचा सुरुवातीपासूनच आहे. आज शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा पक्षाचा विचार हा हिंदुत्वाचा आहे. सर्वांनी एकत्र यावे का हा निर्णय राज साहेब घेतील, मात्र माझे व्यक्तीगत मत म्हणाल तर कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. स्वतंत्र लढलो तर कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, पण राज साहेब बोलले तर एकत्र येऊ असं सूचक विधान राजू पाटील यांनी केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.