आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात!
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेना सोशल मीडियाची जबाबदारी असलेले साईनाथ दुर्गे यांनी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे ताब्यात घेतले. असून या प्रकरणी पोलिसांनी अजून चार-पाच जणांना अटक केल्याचे समजते.
तसेच शीतल म्हात्रेंचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हाट्सअप अॅपवर पाठविणाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तर दहिसर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमा झाले आहेत. यामुळे पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
प्रकाश सुर्वे यांच्या मुलांनी आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल हा मॉर्फ करण्यात आल्याची तक्रार दहिसर पोलीस स्थानकात तक्रार केली असून या प्रकरणी दहिसर पोलिसांनी फेसबुकलासुद्धा पत्र पाठविले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुंबई विमानतळावरून साईनाथ दुर्गेला ताब्यात घेतले.
या प्रकरणी शीतल म्हात्रेंनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर आरोप केले होते. या रॅलीदरम्यान मुख्यमंत्री, शीतल म्हात्रे, प्रकाश सुर्वे यांच्यासह कार्यकर्ते जीपमध्ये असताना एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ मॉर्फ करून बदनामी केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी पत्रकार परिषदेत केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.