Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बहुचर्चित साई रिसॉर्टप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक

बहुचर्चित साई रिसॉर्टप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक



रत्नागिरी : खरा पंचनामा

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ईडीच्या ताब्यातून दापोली पोलिसांनी अटक  केली आहे. न्यायालयाने त्यांना 3 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान साई रिसॉर्ट प्रकरणी उद्योजक माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सध्या देशपांडे यांना दापोलीच्या सब जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. नियम धाब्यावर बसवून साई रिसॉर्टला बिनशर्त परवानगी दिल्याचा ठपका देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दापोली पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रूपा दिघे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन जयराम देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल परब, सुरेश तुपे व अनंत कोळी यांच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात 8 नोव्हेंबर 2022 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने या तिघांवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून 19 नोव्हेंबर 22 रोजी अटकपूर्व जामीन घेतला होता. त्यानंतर याच प्रकरणात मंडल अधिकारी सुधीर पारदुले यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. तर तत्कालीन प्रांतअधिकारी देशपांडे यांना दापोली पोलिसांनी ईडी कोठडीतून या गुन्ह्यात वर्ग करुन घेतले आहे. सध्या जयराम देशपांडे यांना शासनाने निलंबित केले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.