हद्दपारी आदेशाचा भंग, राजारामपुरी पोलिसांकडून एकास अटक
कोल्हापूर : खरा पंचनामा
हद्दपारी आदेशाचा भंग करून हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. सोमवारी दुपारी राजारामपुरी पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.
विशाल वसंत घायतडक (वय २५, रा. शाहुनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त अधीक्षक जयश्री देसाई यांनी हद्दपारी आदेशाचा भंग केलेल्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांची एक पथक गस्त घालत होते.
रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नवशा मारूती मंदीर परिसरात एकजण अंधारात एकजण बसल्याचे पथकाला आढळले. त्याचा संशय आल्याने पथकाने त्याला ताव्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने हद्दपार असूनही शहरात आल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने त्याला तातडीने अटक केली.
राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भगवान शिंदे, अमर आडुळकर, विशाल खराडे, विशाल शिरगावकर, अविनाश तारळेकर, अजिंक्य पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.