अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीवर संशयितांचा खुनी हल्ला
सोलापूर : खरा पंचनामा
पोलिस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून पीडित अल्पवयीन मुलीवर खुनिहल्ला हल्ला करण्यात आला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे.
आरोपींनी पीडित मुलीवर सत्तूर आणि कोयत्याने वार केले. या हल्ल्यात या नराधमांनी मुलीची दोन बोटं छाटल्याची माहिती समोर येत आहे. अक्षय माने आणि नामदेव दळवी अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी 6 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास घडली होती. पीडित तरुणी ही अल्पवयीन असून तिच्यावर 5 मार्च रोजी याच दोघांनी अत्याचार केला होता. त्यानंतर मुलीने त्यांच्याविरोधात 5 मार्च रोजी बार्शी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी सोमवारी त्याच गुन्ह्याच्या तपास कामाच्या अनुषंगाने पीडित मुलीचे आई-वडील हे संध्याकाळी पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा रात्री आठच्या सुमारास अक्षय माने आणि सिद्धेश्वर दळवी हे पीडितेच्या घरी आले. हातात असलेल्या सत्तूर आणि कोयत्याने तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि कपाळाला दुखापत झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे म्हणजे हल्ल्यात तिच्या उजव्या हाताची दोन बोटं देखील तुटली आहेत.
या हल्ल्यानंतर पीडित मुलगी ही बेशुद्ध झाली. तिला बेशुद्ध अवस्थेतच बार्शीतल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकारांनंतर आरोपी अक्षय माने आणि सिद्धेश्वर दळवी यांच्याविरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.