शाहरूखच्या 'मन्नत'मध्ये भिंत तोडून शिरलेल्या दोघांना अटक
मुंबई : खरा पंचनामा
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्या 'मन्नत' बंगल्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी रात्री दोन तरुणांनी या बंगल्याची भिंत तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे.
'मन्नत'ची भिंत तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
भिंत तोडणारे तरुण गुजरातमधील असून दोन्ही तरुणांचा मोबाईलही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19-20 वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना पकडलं आहे.
दोन्ही तरुण शाहरुखचे मोठे चाहते असून त्याला भेटण्यासाठी ते खास गुजरातहून आले आहेत. शाहरुखचा भेटण्याची त्यांची खूप इच्छा आहे. चौकशीदरम्यान तरुणांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे. विनापरवाना खासगी मालमत्तेत प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.