Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो!

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो!



नवी दिल्ली : खरा पंचनामा

मानहानी याचिकेवरील सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना आदेश दिले आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात खासदार राहुल शेवाळे यांनी मानहानीच्या दाव्याची एक याचिका दाखल केली. याबाबत आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. वरिष्ठ वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने बदनामीकारक विधानांचे गांभीर्य लक्षात घेऊन, अर्ज स्वीकारला आहे. हा अर्ज स्विकारताना संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना न्यायालयात हजर राहून सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे समन्स बजावले आहे.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध मनाई आदेश का काढू नयेत, यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संजय राऊत यांनी खासदार आणि आमदारांविरोधात कोणतीही बदनामीकारक विधाने रोखली, असे म्हटले आहे. न्यायालयाने गूगल, ट्विटर, संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना 30 दिवसांच्या आत तुमच्या यूट्यूब आणि ट्विटरवरील मजकूर का काढू नये, अशी विचारणा केली आहे. तुमचे काही जे म्हणणे आहे ते लेखी दाखल करा, असे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी आता 17 एप्रिल रोजी अंतरिम सुनावणी होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.