राणेंचे निकटवर्तीय राजन तेलिंच्या अडचणीत वाढ
कणकवली : खरा पंचनामा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कट्टर समर्थक असलेल्या राजन तेली यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळे व अपहार प्रकरणी चौकशी करावी यासाठी पत्र लिहिले होते. त्यांच्या या पत्राची दखल घेत आता सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय पुणे यांनी कोकण विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेला महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
प्रदीप भालेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीच्या केलेल्या मागणीनंतर सहकार आयुक्त व पुणे निबंधक कार्यालयाने कोकण विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेला या प्रकरणी आवश्यक कारवाई करण्यासाठी पत्र पाठवले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी दिली आहे.
त्यामुळे राणे यांचे कट्टर समर्थक असलेल्या राजन तेली व बँकेतील इतर संचालकांच्या अडचणी मात्र वाढणार आहेत. यासंबंधीची माहिती तक्रारदार प्रदीप भालेकर यांनी दिली. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी सहकार आयुक्त निबंधक कार्यालयात 21 नोव्हेंबर 2022 ला या प्राथमिक संदर्भात तक्रार केली होती. या तक्रारीवर पुणे सहकार आयुक्त/निबंधक कार्यालयानं कोकण विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण यांना आवश्यक कारवाई करण्यासाठी पत्र पाठवले आहे.
राजन तेली" हे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना नारायण राणे व त्यांचे चिरंजीव निलेश राणेच्या" खासदारकीच्या प्रचाराला याच बँकेतून बोलेरो गाड्या कर्ज प्रकरण करून घेतल्या होत्या. या व्यवहाराची चौकशीची मागणी करणारं पत्र सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी पत्राद्वारे केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.