राहुल गांधींना घर, जमीन देण्यासाठी भाजप सरसावली!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
छत्तीसगडच्या रायपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी आपल्याकडे घर नसल्याचं म्हटलं होतं. गेल्या 52 वर्षात आपल्याकडे एकही घर नाहीये, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं होतं.
त्यामुळे राहुल गांधी यांच्या घराची देशभर चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा सुरू असतानाच भाजपने एक वेगळीच गोष्ट केली आहे. राहुल गांधी यांना पीएम आवास योजनेतून घर आणि जमीन मिळावी म्हणून भाजपने चक्क अर्ज केला आहे. वायनाड येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कलपेट्टा येथील नगर पालिकेच्या सचिवाला अर्ज दिला आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना घर देण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधी यांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावं. त्यांना घर द्यावं आणि जमीनही द्यावी, अशी मागणी या अर्जातून करण्यात आली आहे. भाजपचे वायनाड जिल्हाध्यक्ष केपी मधू यांनी हा अर्ज केला आहे. राहुल गांधी यांना कलपेट्टामध्ये एक घर आणि जमीन देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्ह्याच्या केंद्रस्थानीच ही जमीन मिळावी असा आमचा प्रयत्न आहे, असं केपी मधू यांनी सांगितलं.
राहुल गांधी यांना घर बनवण्यासाठी वायनाड ही एक आदर्श जागा आहे. कारण सुट्टी घालवण्यासाठी ते इथे येत आहेत, असंही मधू यांनी म्हटलंय.
राहुल गांधी यांनी रायपूरच्या काँग्रेस अधिवेशनला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी गेल्या 52 वर्षात माझ्याकडे घर नसल्याचं म्हटलं होतं. अलाबादपासून काश्मीरपर्यंत आमच्याकडे घर नाहीये, असं त्यांनी सांगितलं होतं. मला आईने पहिल्यांदा सांगितलं की, आपल्याकडे घर नाहीये. हे सरकारचं घर आहे. सरकारचं घर असल्याने ते आपल्याला सोडावं लागत आहे, असं ते म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.