पोकलेनचे स्पेअर पार्ट चोरणाऱ्या दोघांना अटक : राजारामपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : खरा पंचनामा
गॅरेजमधून पोकलेनचे ब्रेकर सिजल चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 4 ब्रेकर सिजल, एक मारुती कार असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.
प्रकाश शांताराम कोकाटे (वय 23), साहिल राज पाटील (वय 22, दोघेही रा. मोतीनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त अधीक्षक जयश्री देसाई यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक तनपुरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या.
पथक राजारामपुरी परिसरात गस्त घालत असताना दोन्ही संशयितांनी पोकलेनचे ब्रेकर सिजल चोरून मोतीनगर येथील एका मारुती कारमध्ये ते ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे जाऊन कारची तपासणी केल्यावर त्यामध्ये 4 ब्रेकर सिजल सापडले. त्यानंतर दोघांना अटक करून कार आणि चोरीचे 4 सिजल जप्त केले.
पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भगवान शिंदे, अमर आडूळकर, नितीन मेश्राम, विशाल खराडे, विशाल शिरगावकर, अविनाश तारळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.