Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई यांचा भाजपमध्ये प्रवेश

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई यांचा भाजपमध्ये प्रवेश




मुंबई : खरा पंचनामा

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई यांच्यासह अनेकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. देसाई यांनी गेल्या पाच वर्षात मराठा समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती. शिवाय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही देसाई यांना मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष प्रवेश करण्याची गळ घातली होती. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी देसाई यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

मराठा आरक्षण, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न, मराठा मुला मुलींचे वस्तीगृह, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी देसाई यांनी गेल्या पाच वर्षात शासकीय पातळीवर प्रयत्न केले आहेत. मराठा समाजाला आतापर्यंत विविध पक्षांनी आरक्षण देण्याच्या नावाखाली फसवल्याची भावना आहे. मराठा समाजाचे प्रश्न भाजपच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात म्हणूनच देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.

आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आबासाहेब पाटील,गणेश काटकर, राजन घाग, विवेक सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी या सर्व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व कार्यकर्त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.