पान शॉप फोडणाऱ्या दोघांना अटक : विटा पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
रेणावी (ता. खानापूर) येथील एक पान शॉप फोडून त्यातील साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. विटा पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून दुकानातील साहित्यासह एक दुचाकी असा ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
अनिकेत सुनील बनसोडे (वय २४, रा. आंबेडकरनगर, विटा), आतिश दादू वायदंडे (वय २०, रा. फुलेनगर, विटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी चोरीतील गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विट्याचे निरीक्षक डोके यांनी एक विशेष पथक तयार केले होते.
दोघेही संशयित चोरलेला माल घेऊन त्याच्या विक्रीसाठी विट्यात आले होते. याची माहिती निरीक्षक डोके यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून एक हजारांची रोकड, कोल्ड्रिंक्सच्या २४ बाटल्या, विविध कंपन्यांची सिगारेटची ७० पाकिटे, विविध कंपन्यांचे ४ तंबाखूचे पुडे, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच 10 वाय 0104) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर जाधव, तुकाराम नागराळे, रविंद्र धादवड, प्रदीप पाटील, शिवाजी हुबाले, संतोष घाडगे, सुधाकर पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.