Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील जेलमध्ये कैद्याला मारहाण : सहा जणांवर गुन्हा

सांगलीतील जेलमध्ये कैद्याला मारहाण : सहा जणांवर गुन्हा



सांगली : खरा पंचनामा

शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याला सहाजणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. 

यामध्ये सागर उर्फ कृष्णा नरोटे जखमी झाला आहे. याप्रकरणी रोहित उर्फ बाला गजानन गाडे (वय २६), योगेश दिलीप शिंदे (वय २७), करण रामा पाटील (वय २५), धनराज गजानन राऊत (वय २८), विजय उर्फ यशवंत भूपाल सोनावले (वय २५) दत्तात्रय यल्लाप्पा खांडेकर (वय २१) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृह कर्मचारी नागनाथ शंकर मुलादे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहरातील राजवाडा चौक याठिकाणी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बराकमध्ये अनेक कैदी आहेत. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास सर्व कैद्यांना बाहेर काढण्यात आले होते. यावेळी सागर उर्फ कृष्णा नरोटे हा कारागृहातील बराक क्रमांक तीनच्या बाहेर उभा होता. यावेळी संशयित सहाजण नरोटे याच्या जवळ आले. त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. 

घटना उघडकीस येताच याठिकाणी तैनात असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत भांडणे सोडवली. जखमी नरोटे याच्यावर त्याठिकाणी उपचार करण्यात आले. घडलेल्या या घटनेनंतर कारागृह कर्मचारी नागनाथ मुलादे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मारहाण करणारे संशयित हे बलात्कार, खून आणि मोक्का गुन्ह्यातील संशयित असल्याची माहिती पुढे आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.